• A
  • A
  • A
'४२० चा खटला दाखल असलेली व्यक्ती मुख्यमंत्रिपदी कशी?'

नागपूर - काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ४२० कलमाखाली खटला सुरू आहे. त्यामुळे अशी व्यक्ती मुख्यमंत्रिपदावर कशी राहू शकतो ? असा सवाल करत पटोलेंनी फडणवीसांवर हल्ला चढवला.


देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवले, त्यांच्यावर २४ गुन्हे असताना त्यांनी फक्त २२ गुन्हे असल्याचे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते, असेही नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले.

याबाबत जनहित याचिका दाखल करणारे अॅड. बाराहाते यांना मुख्यमंत्र्यांच्या चुलतभावाने धमकावले, याची तक्रार अजनी पोलीस ठाणे आणि नागपूर पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्याचेही नाना पटोले यांनी सांगीतले. बाराहाते यांना धमकावल्याच्या प्रकरणात संजय फडणवीस यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणीही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. संजय फडणवीस यांनी अॅड. बाराहाते यांना धमकवल्याची ध्वनिफित नाना पटोले यांनी पत्रकारपरिषदेत ऐकवली.

यापूर्वीसुद्धा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे लपवल्याचा मुद्दा काँग्रेसने उचचला होता. आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी यावरुनच मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत.


धमकावलेल्या संभाषणाची छापील प्रत


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES