• A
  • A
  • A
ओंकार बिल्डरमुळे आनंदनगरमधील रहिवासी वाऱ्यावर, 'ना घर, ना भाडं'

मुंबई - ओंकार बिल्डरमुळे आनंदनगर येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ओंकार बिल्डरने आजपर्यंत आनंदमगर रहिवाशांना ना घर दिले, ना भाडे. मात्र, आता या बिल्डरच्या धक्कादायक कारभाराची कागदपत्रे 'ईनाडू' इंडियाच्या हाती लागली आहेत. त्यामुळे येथील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


ना भाडं मिळालं, ना घर मिळालं


२००६ साली वडाळा येथील आनंद नगर येथील वसाहत सुराणा या विकासकाने विकसीत करण्यासाठी घेतली होती. २०१० साली या जागेचा सर्व्हे झाला, त्यानंतर २०११ ला झोपड्या तोडण्यात आल्या.
त्यावेळी ओंकार बिल्डरने या झोपडपट्टीचा विकास मी करतो असे सांगून सुराणाकडून ही वसाहत घेतली. आधी सुराणा विकासक नित्यनेमाने रहिवाशांचे भाडं देत होता. मात्र २०१६ ला ओंकारने हा प्रोजेक्ट घेतल्यानंतर आजतागायत आपलं भाडं दिलं नसल्याचा आरोप रहिवाशांनी ईनाडू इंडियाशी बोलताना केला. यामुळे आपल्याला रस्त्यावर येण्याची वेळ आली असल्याचा आरेपही येथील नागरिकांनी केला.


यावेळी बोलताना सुराणा म्हणाले, की ओंकारने या प्रोजेक्टमध्ये फ्रॉड केला आहे. हा प्रोजेक्ट मी मोठ्या विश्वासाने ओंकारला दिला होता. मात्र थोडेसे पैसे देऊन त्याने पूर्ण प्रोजेक्ट टेकओव्हर केला आहे. खोटे रहिवासी दाखवून खोटा एफएसआय मिळवून त्या आधारे येस बँकेचे ४१० कोटींचे कर्ज उचलल्याची माहीती सुराणा यांनी ईनाडूशी बोलताना दिली. याप्रकरणामध्ये ओंकार बिल्डर पोलिसांनाही मॅनेज करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत सुराणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रव्यहार केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान याबाबत ओंकार बिल्डरच्या कार्यालयाशी ईनाडूच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता कोणतेही सविस्तर उत्तर मिळालेले नाही.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES