• A
  • A
  • A
'दबंग' महिला अधिकारी; कत्तलखान्यावर मारला छापा, ८० जनावरांना जीवनदान

गिरीडीह - झारखंडमधील गिरीडीह जिल्ह्यातील एका धडाकेबाज सनदी महिला अधिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या केवळ नावानेच गुन्हेगारांना घाम फुटत आहे. विजया नारायण जाधव असे या दबंग महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या आयएएस असून झारखंडमध्ये उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

विजया नारायण जाधव
विजया जाधव यांनी आज सकाळी अशीच एक धडाकेबाज कारवाई केली. जाधव यांनी गिरीडीह येथील कुरेशी गल्लीतील कत्तलखान्यावर छापा मारला आणि मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस जप्त केले. या कारवाईमध्ये त्यांनी ५ जणांना ताब्यात घेतले. तर १५ घरांना टाळे ठोकले. या कारवाईची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी या दबंग महिला अधिकाऱ्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.कुरेशी गल्लीमध्ये अवैधरित्या कत्तलखाना चालवला जात होता. याची माहिती मिळताच विजया जाधव यांनी आज सकाळच्या प्रहरातच या कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी हातात केवळ पाण्याची बाटली घेऊन आणि मॉर्निंग वॉकच्या वेशामध्ये दाखल झालेल्या जाधव यांना पोलीस फौजफाट्यासह पाहाताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी तेथील कत्तलखान्यावर छापा मारला आणि तेथील मांस जप्त करत पशुवैधकीय अधिकाऱ्यांना त्या मांसाचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले.

कुरेशी गल्लीत मारलेल्या या छाप्याच्या कारवाईवेळी पोलिसांनी कुरेशी गल्लीला तीनही बाजूंनी घेरले होते. यावेळी त्या पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक प्रमोद कुमार मिश्रा हे करत होते. त्यावेळी तेथील काही नागरिकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. मात्र, पोलिसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर देत परिस्थिती नियंत्रणात आणली. या कारवाईवेळी विजया जाधव यांनी कत्तलीसाठी आणलेल्या जवळपास ८० लहान मोठ्या जनावरांना मुक्त केले. यामध्ये काही दूध देणाऱ्या गायींचाही समावेश होता.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES