• A
  • A
  • A
काँग्रेस पूर्ण ताकदीने उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार - राहुल गांधी

लखनौ - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे बहीण प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यासह ४ दिवसाच्या लखनौ दौऱ्यावर आहेत. लखनौला पोहचल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विमानतळ ते पक्ष कार्यालयापर्यंत रोड शो केला होता. काँग्रेस पक्ष पूर्ण शक्तीनिशी उत्तर प्रदेशात निवडणूक लढवणार, असे राहुल गांधी यांनी रोड-शो संपल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

राहुल गांधी कार्यकर्त्यांशी बोलताना


LIVE UPDATES -
  • प्रियंका आणि राहुल गांधींनी सरदार पटेलांच्या पुतळ्याला वाहिली आदरांजली
  • देशाच्या चौकीदारानेच देश आणि हवाई दलाचे पैसे चौरले - राहुल गांधी
  • उत्तर प्रदेश हा देशाचा प्राण असून इथे आम्ही फ्रंट फूटवर लढू - राहुल गांधी
  • उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही - राहुल गांधी
  • प्रियांका आणि राहुल गांधीचे लखनौमध्ये जोरदार स्वागत
  • काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोड शोमध्ये जल्लोष
  • काँग्रेसची शक्तिप्रदर्शनासाठी जय्यत तयारी


हेही वाचा -मोदींनी भ्रष्टाचार सुलभ व्हावा, अशा तरतुदी केल्या - राहुल गांधी
उत्तर प्रदेश पूर्वच्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि पश्चिमचे महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पक्षाध्यक्ष राहुल गांधींसह आज लखनौ दौरा सुरू होत आहे. हा एकूण १२ किलोमीटरचा 'रोड शो' असणार आहे. हा प्रियांका गांधीच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशानंतरचा पहिला दौरा असून तो काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 'रोड शो'नंतर हे तीनही नेते पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील.
कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. पक्षाच्या मुख्यालयात अनेक नवीन खोल्या बांधल्या आहेत. तसेच, एक मीडिया हॉलही बांधण्यात आला आहे. प्रियांका यांच्या हस्ते या हॉलचे उद्घाटन होणार आहे. एका बैठकीदरम्यान, प्रियांका यांनी राज्यांमधून फोडाफोडीचे राजकारण संपवणार असल्याचे म्हटले होते. तसेच, लोकांना एकत्र आणणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES