• A
  • A
  • A
नवीन बुटाने केला किशोरवयीन मुलाच्या स्वप्नांचा चुराडा

श्रीकाकुलम - आपल्या गरीब आई-वडिलांचे कष्ट संपावे म्हणून एका किशोरवयीन मुलाने स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी तो अहोरात्र मेहनतही घेत होता. मात्र त्याच्याच नव्या बुटाने त्याचा घात केल्याची गोष्ट आंध्र प्रदेश राज्यातील गारीविदी येथे घडली आहे.

रेल्वे रुळात अडकलेला बूट


हेही वाचा - ‘त्या’ अपघातानंतरही रेल्वे प्रशासनाची उपाययोजना कुचकामी..


शुक्रवारी सुरेशचा कॉलेजचा दुसराच दिवस होता. त्यासाठी तो बसमधून राजम येथे आला. तेथून त्याला रेल्वे स्थानक ओलांडून कॉलेजला जायचे होते. मात्र कॉलेजला जायला उशीर झाल्याने त्याने रेल्वेरुळ ओलांडून पलिकडे जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वेरुळ ओलांडताना अचानक त्याचा नवीन बूट रुळात अडकला. त्याने खूप प्रयत्न करूनही त्याला बुटातून पाय बाहेर काढता येत नव्हता. त्याचवेळी पालासा-विशाखापट्टणम रेल्वे मार्गवर एक मालगाडी वेगाने त्याच्या दिशेने येत होती. त्यावेळी त्याने बुटातून पाय बाहेर काढण्यासाठी संपूर्ण ताकद लावली. परंतू तो अयशस्वी झाला. परिणामी रेल्वेखाली आल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत्यूमुखी पडलेला सुरेश

हेही वाचा - धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES