• A
  • A
  • A
दहशतवाद्यांनी अपहरण केलेला भारताचा जवान शहीद, पुलवामात आढळून आला मृतदेह

श्रीनगर - दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या एका जवानाचे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली आहे. औरंगजेब, असे या अपहरण करण्यात आलेल्या जवानाचे नाव होते. त्याचा मृतदेह पुलवामातील गुसू या गावात आढळून आला आहे.


पुलवामामधून अपहरण करण्यात आलेला हा जवान दहशतवादी समीर टायगरच्या चकमकीत सहभागी होता. औरंगजेब हा पूँछ येथे राहणारा होता. सुट्टीसाठी घरी परतत असताना औरंगजेबचे सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केले.


रमजानच्या काळात भारतीय लष्कराने शस्त्रसंधी जाहीर केली आहे. मात्र, दहशतवाद्यांच्या भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत. औरंगजेब अपहरण प्रकरणानंतर हे दिसून आले आहे. दरम्यान, औरंगजेबच्या शोधासाठी पोलिसांनी माहिती मिळताच तपासकार्य हाती घेतले होते.

व्हिडिओ : शुक्लांनी 'असा' केला आईचे दूध विचारणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES