• A
  • A
  • A
VIDEO- सर्वांसमोर पोटच्या पोरीच्या वयाच्या तरुणीचा विनयभंग, नराधम कॅमेऱ्यात कैद

कोलकाता - हातमाग आणि हस्तकला प्रदर्शन पहायला आलेल्या एका मुलीचा एका मध्यम वयीन व्यक्तीने भर गर्दीत विनयभंग केल्याची विचलित करणारी घटना घडली असून हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधित व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात चिनसुरा येथे घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही पोरगी आरोपी व्यक्तीच्या पोटच्या पोरीच्या वयाची आहे.

विनयभंग करताना आरोपी


हेही वाचा - पुण्यात ६५ वर्षीय वृद्ध भिकारी महिलेशी अश्लील चाळे; तरुणास अटक


संबंधित व्हिडिओत मुलगी प्रदर्शन पहात असताना आरोपी निर्लज्जपणे आपले शरिर मुलीच्या शरिराला मागच्या बाजूने स्पर्श करताना दिसत आहे. या प्रकाराने मुलगी प्रचंड गोंधळलेली दिसत असून आरोपीने पीडित मुलीसोबत हा प्रकार जवळजवळ १ मिनिट केला. यावेळी त्याच्या मागे काही लोक उभे होते. त्यांनाही हा प्रकार दिसला. पण कुणी त्याला अडवले नाही. त्यानंतर एक महिला पीडित मुलीच्या आणि आरोपीच्या मध्यभागी आल्याने आरोपीने हा प्रकार थांबवला.

हेही वाचा - ओला कॅब चालकाने महिला प्रवाशाचे कपडे उतरवत काढले अश्लील फोटो

हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला व प्रसार माध्यमांवर प्रसारित केला. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. चिनसुरा प्रदर्शनाचे व्यवस्थापक श्रीवास मंडल यांनी म्हटले, की आम्ही भेट देणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक सीसीटीव्ही बसवले होते. तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे हे आमच्या प्रदर्शनात झाले नसल्याचे मी खात्रीने सांगू शकतो. ते पुढे म्हणाले, की हा प्रकार कोठेही झालेला असला तरी आरोपीला शिक्षा व्हावी हीच आमची मागणी आहे. नागरिकरण झालेल्या समाजात अशी मानसिकता अजिबात स्वीकारायला नको.

हेही वाचा - विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या नराधम प्राध्यापकास बेड्या

समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक लोकांनी पश्चिम बंगाल सरकार व पोलिसांना प्रश्न विचारत तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने मुलींवरील अत्याचाराच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. काही आठवड्यांपूर्वी कोलकात्यात बसमध्ये एक व्यक्ती हस्तमैथून करत असल्याचा प्रकार समोर आला होता. एका मुलीने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES