• A
  • A
  • A
तांदूळ गिरणी कारकून बनला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री; येडियुरप्पांचा प्रवास

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. २ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर भाजपचे बी. एस. येडियुरप्पा आज तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक ते तीन वेळा मुख्यमंत्री असा येडियुरप्पांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा (संग्रहीत छायाचित्र)


२७ फेब्रुवारी १९४३ मध्ये कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात येडियुरप्पा यांचा जन्म झाला. १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर समाज कल्याण विभागामध्ये प्रथम श्रेणी कारकून म्हणून येडियुरप्पा काम करु लागले. त्यानंतर ते शिकारीपुरा येथे स्थायिक झाले आणि तांदूळ गिरणीत कारकून म्हणून कामाला लागले.


येडियुरप्पांचा राजकीय प्रवास १९७० साली सुरु झाला. १९७० मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक होते. नंतर शिकारीपुरा नगर नगरपालिकेसाठी निवडून आले आणि जनसंघाच्या तालुकाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९७५ मध्ये ते शिकारीपुरा नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. १९८३ मध्ये ते शिकारीपुरा या मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. १९८८ मध्ये ते भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष झाले.

१९९४ मध्ये कर्नाटक विधानसभेत ते विरोधी पक्षनेते झाले. १९९९ मधील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, भाजपाने त्यांना कर्नाटक विधान परिषदेतून पुन्हा एकदा आमदारकी दिली. २००४ मध्ये ते पुन्हा एकदा निवडून आले आणि त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळाले.

कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपाने धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाचे नेते एच डी कुमारस्वामी यांच्याशी युती केली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी २० महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद विभागून देण्याचा निर्णय त्यावेळी झाला. याप्रमाणे कुमारस्वामी यांच्यानंतर येडियुरप्पा यांना संधी मिळणार होती. मात्र, कुमारस्वामी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढला.

२००७ मध्ये पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेतला. यानुसार येडियुरप्पा २००७ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. २०११ मध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षाने पाठिंबा काढल्याने येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. २०१२ मध्ये भाजपमधून बाहेर पडून त्यांनी कर्नाटक जनता पक्ष हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र २०१३ मध्ये ते भाजपमध्ये परतले.

लोकायुक्त एन संतोष हेगडे यांनी खाणकामाप्रकरणी लाचखोरीसाठी दोषी ठरवल्याने येडियुरप्पा यांना धक्का बसला. भ्रष्टाचाराप्रकरणी तुरुंगात जाणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले. जवळपास २० दिवस ते बंगळुरूतील तुरुंगात होते. शिकारीपुरामधून त्यांनी यंदा सातव्यांदा निवडणूक लढवली. त्यांनी काँग्रेसच्या जी. मालतेशा यांचा ३५ हजार मताधिक्क्याने पराभव केला. मुख्यमंत्री झाले असले तरी बहुमत सिद्ध करायचे आव्हान येडियुरप्पांसमोर आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES