• A
  • A
  • A
माझे सरकार येईल तेव्हा मला हा प्रश्न विचारा, राहुल गांधींचे विद्यार्थिनीला उत्तर

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर असून सोमवारी ते मतदारसंघातील एका शाळेत कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी तिथल्या विद्यार्थींनीशी त्यांनी संवाद साधला. राहुल गांधींशी चर्चा करत असताना विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून राहुल यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.


अमेठीतील एका शाळेतील विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थीनीने त्यांना प्रश्न विचारला, की शासनाने विविध नियम तयार केले आहेत परंतु ते गावांमध्ये योग्य रीतीने का राबवले जात नाहीत ? यावर राहुल यांनी स्मितहास्य करुन उत्तर दिले, "हा प्रश्न तुम्ही मोदीजींना विचारा. सरकार माझे नाही. जेव्हा माझे सरकार असेल तेव्हा मला विचारा." काँग्रेस अध्यक्षांच्या उत्तराने विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला.याच विद्यार्थिनीने गांधींना अमेठीविषयी प्रश्न विचारला असता, खासदार गांधींनी सांगितले, "अमेठीला चालवायचे काम योगीजी करतात. माझे काम लोकसभेत नियम बनवण्याचे आहे. परंतु योगीजींचे काम उत्तर प्रदेशला चालवण्याचे आहे आणि योगीजी दुसरेच काम करत आहेत. वीजेची कामे न करता, पाण्याची कामे न करता, शिक्षणाचे न करता क्रोध पसरवत आहेत," असे म्हणून उत्तराच्या अपेक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद अर्धवट ठेवून राहुल गांधी निघून गेले.

आपल्या संसदेतील भूमिकेशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास करणे हीदेखील खासदारांची जबाबदारी असते. खासदाराला स्थानिक विभाग विकास योजने अंतर्गत दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी मिळतो. यासोबतच आपल्या स्थानिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे व तिथे विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याचे हक्क संविधानातर्फे खासदारांना दिलेले असतात. आपल्या मतदारसंघात राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा हक्क खासदारांना असतो. राहुल गांधी सोमवारपासून अमेठी, रायबरेलीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींची आई व काँग्रसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES