• A
  • A
  • A
भाजप नेत्याच्या घरामध्ये अश्लील पार्टी, २५ अर्धनग्न तरुण-तरुणींना अटक

वाराणसी - भाजप नेत्याच्या घरात बुधवारी रात्री वाढदिवसाच्या नावाखाली अश्लील पार्टी सुरू होती. पोलिसांनी या पार्टीवर छापा टाकून अर्धनग्नावस्थेत असलेल्या २५ तरुण- तरुणींना ताब्यात घेतले आहे. हे सर्व तरुण घटनास्थळी अर्धनग्न अवस्थेत नृत्य करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वाराणसीतील दुर्गाकुंड परिसरात ही पार्टी सुरू होती.


वाराणसीमध्ये वाढदिवसाच्या नावाखाली अशा प्रकारे अश्लील पार्टी करण्याचे प्रकरण पहिल्यांदाच समोर आले आहे. त्यामुळे अशा घटनाबाबत पोलीसही अनभिज्ञ आहेत. या पार्टीला रेव्ह पार्टी म्हणायचे की इतर काही, यावरुन पोलीस संभ्रमात आहेत. मात्र हा सर्व प्रकार रेव्हपार्टी सदृश्य आहे असल्याचे पोलिसांचे मत आहे. या पार्टीमधून मोठ्या प्रमाणात दारू आणि नशेची इतर साधने जप्त करण्यात आली आहेत.


या प्रकरणी पोलिसांना बुधवारी रात्री काही नागरिकांनी दुर्गा कुंड येथील बत्रा बँक्वेट हॉलमध्ये सुरू असलेल्या या अश्लील पार्टीची माहिती दिली होती. ज्यामध्ये अनेक मुले मुली अर्धनग्न होऊन नृत्य करत होते. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी त्या पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी सर्व तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. ही पार्टी ज्या बत्रा बँक्वेट हॉलमध्ये सुरू होती तो हॉल एका भाजप नेत्याच्या मालकीचा आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या भाजप नेत्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  MAJOR CITIES