• A
  • A
  • A
इम्रान खानला भारतीय मुले आहेत, पहिल्या पत्नीचा गंभीर दावा

कराची - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तथा राजकीय नेता इम्रान खानवर टीका करणाऱ्या त्याच्या माजी पत्नीने आणखी एक नवा गंभीर आरोप केला आहे. इम्रानला बेकायदेशीर पाच मुले असून त्यातील काही भारतात आहेत, असा दावा रेहम खान हीने केला आहे.


रेहम हिने तिचे आत्मचरित्र लिहिली आहे. या पुस्तकातून इम्रान आणि रेहम यांच्या कटू नात्याचा खुलासा करण्यात आला आहे. २०१५ मध्ये झालेल्या विवाहनंतर इम्रान त्या बेकायदेशीर मुलांबद्दल मला सांगितले होते, असे रेहमने म्हटले. इम्रान टायरियन व्हाईट या मुलीचा बाप आहे, असा आरोप केला जातो. टायरियनची आई सिता व्हाईट हिनेही इम्रानवर आरोप केले होते.
हेही वाचा -
तालिबान्यांनी नष्ट केलेल्या 'त्या' बुद्ध मूर्तीची पुनःस्थापना
'ती एकमेव नाही हे तुला माहीत आहे. पण एकूण पाच जण आहेत, हे मला माहीत आहे', अशी टिप्पणी रेहमने पुस्तकात केली आहे. त्यातील काही मुले भारतीय आहेत, असा दावाही तिने पुस्ताकातून केला असून, इम्रानबद्दल अनेक धक्कादायक माहिती तिने समोर आणली आहे.
हेही वाचा -
विम्बल्डन २०१८ : ज्युलिया जॉर्जेस पराभूत करत सेरेना विल्यम्सची अंतिम फेरीत धडक
रेहमने आपल्या आत्मचरित्रामध्ये इम्रान खानवर गंभीर आरोप केले आहेत. इम्रानचे त्याचा तहरीक-ए-इंसाफ पक्षातील काही नेत्यांशी तसेच पाकिस्तानी सिनेकलाकारांशी समलैंगिक संबध असल्याचे तिने म्हटले आहे. या पुस्तकात इम्रानचे समलैंगिक संबध असलेल्या व्यक्तींच्या नावांचाही रेहमने उल्लेख केला आहे. यामध्ये तहरीक-ए-इंसाफचे नेते मुराद सईद आणि पाकिस्तानी अॅक्टर हमजा अली अब्बासी यांची नावे आहेत.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES