• A
  • A
  • A
पाण्याचा बर्फ झाला तरीही मगरी जिवंत राहण्यामागचे रहस्य..

उत्तर कॅरोलिना - अमेरिकेत लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबत उत्तर कॅरोलिना पार्कने एका तलावात गोठलेल्या मगरींचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये या मगरींचे सर्व शरीर हे गोठलेल्या पाण्यात आहे मात्र त्यांचे नाक गोठलेल्या पाण्याच्या वरती असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ ओशियन इस्ले बीचवर असलेल्या शालौट रिवर स्वाम्प पार्कने फेसबुकवर टाकला आहे. यात आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे पाणी गोठलेले असताना देखील या मगरी जिवंत आहेत.

गोठलेल्या पाण्यात जिवंत मगरी

गोठलेल्या पाण्यात जिवंत मगरी
गोठलेल्या पाण्यात जिवंत राहण्यामागील मगरींचे रहस्य -


- तलावातील पाणी गोठण्याचा हा काळ या मगरींचा हॅगिंग आउटचा काळ समजला जातो. या मगरी पाणी गरम होण्याची वाट बघत असतात.

-अनेक घटनांमध्ये मगरी अनेक दिवस गोठलेल्या पाण्यात गोठलेल्या स्थितीत राहतात आणि त्यानंतर पाणी सामान्य झाल्यावर त्या हालचाली करू लागतात.

-पार्कने म्हटले आहे की, मगरी आपल्या शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी उर्जा वाचवतात. त्यामुळेच त्या अशा स्थितीत कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत.

गोठलेल्या पाण्यात जिवंत मगरी

-या व्हिडिओला आत्तापर्यंत जवळजवळ दीड लाख लोकांनी पाहिले आहे.

- तज्ज्ञांनी असेही म्हटले आहे की, तलावातील पाणी गोठणार असल्याची कल्पना मगरींना पाणी गोठण्याच्या पूर्वीच आलेली असते. त्यानंतर त्या आपले नाक पाण्याच्या पृष्ठभागापासून वर आणतात आणि पाण्याला गोठून देतात.

-तज्ज्ञांनी म्हटले आहे की, अशा स्थितीत मगरींच्या अंगावरून चालले तरी त्या प्रतिक्रिया देणार नाही. जोपर्यंत पाणी विरघळत नाही. तोपर्यंत त्या कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES