• A
  • A
  • A
...म्हणून नवऱ्याच्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका

गप्पांच्या भरात महिला आपल्या नवऱ्याबद्दल काही गोष्टी इतरांना सांगून टाकतात. तुम्हीही असे करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण असे करणे पुढे जाऊन तुम्हालात महागात पडू शकते.


नवऱ्यासोबत भांडण झाल्यावर त्याच्याबद्दल माहेरी सांगायची काही महिलांना सवय असते. आपले दुःख कथन केल्यामुळे त्यांना त्या वेळेपुरती सहानुभूती मिळते खरी, मात्र पुढे जाऊन हीच गोष्ट त्यांना त्रासदायक ठरू शकते. असे केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या वैवाहिक आयुष्यावर होतो.

तुमचे तुमच्या नवऱ्याशी भांडण झाले असल्यास तुम्ही त्याबद्दल तुमचे मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबियांना सांगता. त्यामुळे ते तुम्हाला तेवढ्यापुरती सहानुभूती दाखवतील परंतु त्याचवेळी तुमच्या पतीच्या प्रती त्यांच्या मनात नकारात्मकता निर्माण होईल. शिवाय तुमच्या पतीबद्दल त्यांच्या मनातील प्रतिष्ठा कमी होईल.

तुमचे वाद जरूर मिटतील परंतु तुमच्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांच्या मनातील तुमच्या पतीबद्दल निर्माण झालेली प्रतिमा कायम राहिल.

तुमच्या पतीच्या पगाराबद्दलही कोणाला सागू नका. कारण आजही समाजामध्ये एखाद्याची किंमत त्याच्या पगारावरून ठरवली जाते.

तुमच्या पतीला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, तर ते कोणला सांगू नका. कारण लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा या गोष्टीची खिल्ली देखील उडवू शकतात.

तुमच्या पतीला कोणता आजार असल्यास त्याबद्दल इतरांसोबत चर्चा करू नका. कारण लोक त्यांच्यापासून दूर जाऊ शकतात व त्याचा मानसिक त्रास तुमच्या पतीला सहन करावा लागू शकतो.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES