• A
  • A
  • A
अशाप्रकारे करा आपल्या जोडीदाराला आकर्षित

जोडीदारासोबत घालवलेले क्षण आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतात. हे क्षण इतके सुंदर असतात, की आयुष्यभरासाठी आपल्या मनात त्यांच्या आठवणी कोरल्या जातात. कायमचे मनाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखे हे क्षण निर्माण करण्यासाठी जोडीदाराला स्वतःकडे आकर्षित करावे लागेल. यासाठी तुम्हाला प्रयत्नपूर्वक काही गोष्टी कराव्या लागतील.

आठवणींना उजाळा द्या


आपल्या जोडीदारासोबत एखाद्या रोमॅन्टिक जागी बसून तुम्ही एकत्र घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींना उजाळा द्या. त्याचा आवडीचा ड्रेस आणि परफ्युम लावून हातात हात धरून केलेल्या या गप्पा तुम्ही कधीही विसरू शकणार नाही.

क्षणांना करा कैद

आपल्या जोडीदारासोबतच्या सुंदर क्षणांना कैद करून ठेवा. कॅमेऱ्यात छोटे व्हिडिओ बनवून आपल्या आठवणी साठवून ठेवा. निवांत क्षणी जोडीदारासोबत या आठवणी शेअर करा.

आवडीकडे लक्ष द्या

जोडीदाराच्या खाण्या-पिण्याच्या आवडी लक्षात ठेवा. त्यांच्यासोबत बसून या गोष्टी शेअर करा. वातावरण अधिक रोमॅन्टिक बनवण्यासाठी त्यांची स्तुती करा.

मनातील गोष्टी सांगा

जोडीदाराला पत्र लिहून मनातील भावना व्यक्त करा. जर तुम्ही लिहू शकत असाल तर त्याच्यासाठी एखादी कविता लिहा.

खोली सजवून सरप्राईझ द्या

जोडीदाराचा मूड रोमॅन्टिक बनवण्यासाठी आपल्या खोलीला फुले, सेंटेड कॅन्डल व इसेंशियल ऑईलने सुगंधित करा.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES