• A
  • A
  • A
आपल्या अवयवांच्या आकाराची ही फळे खाल्ल्याने होईल लाभ

अनेक फळे आपल्या शरीरातील अवयवाप्रमाणे दिसतात. ही फळे त्या अवयवासाठीही तितकीच लाभदायक असतात. मथळा वाचून तुमच्या डोक्यात पहिल्यांदा मेंदू हा अवयव आला असेल. परंतु अशी अनेक फळे आहेत जी विविध अवयवांसारखी दिसतात. ही फळे कोणती आणि ती खाण्याचे काय फायदे आहेत, हे जाणून घ्या.

. अक्रोड - मेंदू

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, अक्रोड खाणे मेंदूसाठी चांगले आहे. पण अक्रोडकडे लक्ष देऊन पाहिले तर तुम्हाला जाणवेल की अक्रोड मेंदूसारखे दिसते. मेंदूला ज्याप्रमाणे उजवा व डावा भाग असतो त्याचप्रमाणे अक्रोडचीही विभागणी दिसून येते.

. गाजर - डोळे

गाजर डोळ्यांसारखे दिसते याचे प्रात्यक्षिक हवे असेल तर गाजराचा आडवा काप घ्या. तुम्हाला डोळ्याप्रमाणे प्युपिल व आयरिसचा आकार त्यावर दिसेल. डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन ए चा खजिना असलेले गाजर खाल्ल्याने डोळे चांगले राहतात.

. सिलरी - हाडे

लांब, बाकदार आकार असलेली सिलरी हाडांसारखी दिसते. ही सिलरी हाडांच्या आरोग्यासाठी चांगली असते. हाडांचे बळ वाढवणाऱ्या सिलिकॉनचा स्त्रोत असलेली सिलरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. याविषयीची आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे हाडे व सिलरी या दोहोंमध्ये २३ टक्के सोडियम आढळते.

. टोमॅटो - हृदय

टोमॅटोचे वरील आवरण काढल्यास तुम्हाला आत हृदयाप्रमाणे वेगवेगळे कप्पे दिसतील. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, टोमॅटोत आढळणाऱ्या लायकोपीन या घटकामुळे नियमित टोमॅटो खाणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी होतो.

. मशरूम - कान

मशरूमचा तुकडा अगदी कानासारखा दिसतो. कानाच्या आरोग्यासाठी मशरूम लाभदायक आहे. श्रवणशक्तीसाठी आवश्यक व्हिटॅमिन जी मशरूममध्ये भरपूर प्रमाणात आढळते.

. अॅव्होकॅडो - गर्भाशय

अॅव्होकॅडोचा अंडाकृती आकार गर्भाशयासारखा दिसतो. फॉलिक अॅसिडचा स्त्रोत असलेले अॅव्होकॅडो प्रजनन संस्थेच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES