• A
  • A
  • A
नेहाने उडवला भडका, बहुप्रतीक्षित 'शिकारी'चा टिझर रिलीज !

मुंबई - 'शिकारी' चित्रपटाच्या टीझरची प्रतीक्षा संपली असून ऐन उन्हाळयात भडका उडवणारा टिझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर भडका उडेल असा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला होता, त्याला पुरक असाच हा टिझर आहे.


नेहा खानच्या उघड्या पायानंतर तिची उघडी पाठ शिकारीच्या दुसऱ्या पोस्टरवर दिसली होती. चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये नेहा खान सोबत मराठीतला एक आघाडीचा अभिनेता सिध्दार्थ जाधव दिसला होता. या टिझरच्या शेवटी भारत गणेशपुरेचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे मराठीतील अनेक नामवंत कलाकार 'शिकारी'त असणार हे स्पष्ट झालंय.


महेश मांजरेकर प्रस्तुत, विजू माने दिग्दर्शित 'शिकारी' हा चित्रपट नेहा खानचा मराठीतला पहिला चित्रपट असणार आहे. तसेच पदार्पणातच बोल्डनेसच्या सगळ्या सीमा पार करण्याचे या अभिनेत्रीने ठरवले असे दिसतेय.

विजू माने दिग्दर्शित 'शिकारी' हा चित्रपट येत्या २० एप्रिलला हीट वाढवणार असं दिसतंय.