• A
  • A
  • A
धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

मुंबई- आपल्या निस्सीम सौंदर्याने आणि अप्रतिम अदाकारीने कित्येक दशके सिनेप्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी माधुरी दीक्षित. दशकभर ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब राहून तिने चित्रपटांमध्ये पुनरागमन केल्यावर चाहत्यांमध्ये उत्साहाची लहर आली. मात्र, माधुरी मराठी चित्रपट कधी करणार याची वाट तिचे चाहते पाहत होते. आता ती मराठी चित्रपट करतेय ही बातमी धडकली आणि पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत आनंदोत्सवाचे वातावरण झाले.

संग्रहीत


आपल्या दिलखुलास हास्याने कित्येक कळ्या खुलवणारी माधुरी आता मराठी सिनेसृष्टीत झळकणार ही बातमी पसरली आणि या चित्रपटाच्या नावाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. चाहत्यांची ही उत्सुकता जास्त ताणून न धरता अखेर मकरसंक्रांतीचे औचित्य साधत, धकधक गर्लने आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाचे नाव ट्विटरवर घोषित केले आहे. ‘बकेट लिस्ट’ असे या चित्रपटाचे नाव असून यानिमित्ताने लाँच करण्यात आलेल्या टायटल टीझर पोस्टरवरील माधुरीतला मराठमोळेपणा तिच्या चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी होत आहे.


माधुरी दीक्षितच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

गृहिणी, आई, मैत्रीण, बहिण, मुलगी अशा कैक भूमिका एकाचवेळी पार पाडत असलेल्या स्त्रियांचे प्रतिनिधीत्त्व करणारे हे व्यक्तिमत्त्व माधुरीच्या रूपात 'बकेट लिस्ट' मधून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टायटल टीझर पोस्टरमधून दिसत आहे. या सगळ्याच भूमिकांमध्ये अग्रेसर असणारी ही गृहिणी आपल्या वेगळेपणातून प्रेक्षकांची करमणूक करणार असल्याचा विश्वास दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केला आहे.माधुरीचा हा मराठमोळा अवतार येत्या उन्हाळ्यात प्रेक्षकांना गारवा देऊन जाणारा ठरणार आहे. सुट्टीच्या दिवसांत प्रदर्शित होणारा ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांना हसता हसता प्रेरणा देऊन जाईल, अशी आशा माधुरीने व्यक्त केली आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES