• A
  • A
  • A
'श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण बोनी कपूर'

मुंबई - बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे अचानक निधन झाल्याने सर्वांनाच झटका बसला आहे. या धक्क्यातून अद्यापही चाहते आणि बॉलिवूडकर सावरलेले नाही. २४ फेब्रुवारीला दुबईत श्रीदेवींचे निधन झाले. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याच दरम्यान श्रीदेवी यांचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे.

संग्रहीत फोटो


वेणुगोपाल रेड्डी यांनी एका तेलुगू वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला, की श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण त्यांचे पती बोनी कपूर आहेत. श्रीदेवींच्या आयुष्यात प्रचंड दुःख होते, असे ते म्हणाले. सर्वांसमोर हसत राहणारा चेहरा आतून प्रचंड दुःखात होता.


बोनी कपूर यांचे बरेच चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे ते तोट्यात होते. यामुळे बोनी कपूर यांनी श्रीदेवींच्या नावावर असलेली अनेक संपत्ती विकून टाकली. संपत्ती विकली गेल्याने आणि आर्थिक स्थिती ठीक नसल्याने श्रीदेवी कायम चिंतीत असायच्या. याचे कारणही बोनी कपूर हेच होते. कुटुंबाला सांभाळण्यासाठीच श्रीदेवींनी पुन्हा कामास सुरुवात केली. या चिंतेमुळे मृत्यूनंतरही तिच्या जीवाला शांती मिळू शकणार नाही,’ असे वेणुगोपाल यांनी म्हटले.

श्रीदेवींचे पोस्टमार्टम रिपोर्टसमोर आल्यानंतर सिनेनिर्माता राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या मृत्यूवर सवाल उपस्थित केला होता. वर्माने याबाबतचे एक पत्र लिहिले होते. व्यक्ती म्हणून ती निष्पाप होती. पण, अनेक वाईट अनुभवांमुळे ती मनातून पार कोमेजली होती. जिवंत असताना तिला कधीच शांती लाभली नाही. ती जगातील सर्वाधिक दु:खी महिला होती’, असे रामगोपाल वर्मा यांनी लिहिले होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES