• A
  • A
  • A
बीडच्या वृद्ध जोडप्याने रायगडावर अनुभवला रितेशचा दिलदारपणा...

रायगड - रायगड किल्ल्यावर मेघडंबरीत फोटोसेशन केल्याने रितेश देशमुख व सहकाऱ्यांना चौफेर टीकेचा सामना करावा लागला होता. त्याबद्दल त्याने माफीही मागितली. महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे केवळ भक्तीभाव होता. कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मात्र, तरीही आमच्या कृत्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, तर आम्ही त्यांची माफी मागतो, असे रितेशने ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते. मात्र, त्यादिवशीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, त्या व्हिडिओत वादग्रस्त असे काही नसून, उलट त्यातून त्याच्या मनमिळाऊपणाचे व सामान्य लोकांच्या, विशेषत: मराठवाड्यातील लोकांप्रतीच्या त्याच्या आपुलकीचे दर्शन होते. आता, हा व्हायरल व्हिडिओ पाहून टीका करणारे रितेशच्या या कृतीचे कौतुक करतील का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांकडून उपस्थित होत आहे.

सोशल मिडिया


अभिनेता रितेश व दिग्दर्शक रवि जाधव ज्या दिवशी रायगडावर गेले होते, त्याच दिवशी एक वृद्ध जोडपं आणि त्यांचा मुलगा हेही रायगड सर करत होते. मुलगा वृद्ध आई-वडिलांना सोबत घेऊन सावकाशपणे गडावर जाताना रितेश व सहकाऱ्यांना दिसला. भर पावसात गड चढत आहेत, याबद्दल त्यांना विशेष वाटले. रितेशच्या टीममधल्या एकाने त्यांना विचारले, की आम्हाला तुमच्या आई-वडिलांना बोलायचे आहे. त्यांची चर्चा सुरू झाली. चर्चेतून ते कुटूंब मराठवाड्यातील बीडचे असल्याचे समजले.
बीड कानावर पडताच, रितेश पुढे आला व म्हणाला, अरे वा! मी लातूरचा आहे. ओळखलं का ? त्यांनी रितेशला पाहिलं असेल पण त्या वृद्ध जोडप्याला लक्षात आले नसेल. मात्र, त्यांच्या मुलाने लगेच पुढे होऊन हे रितेश देशमुख सर विलासरावांचे चिरंजीव, अशी ओळख करून दिली. विलासरावांचे चिरंजीव असल्याचे समजाताच, त्यांनी रितेशचा हात हातात घेत त्यांनी जवळपास १० मिनिटे गप्पा मारल्या. रितेशने त्यांच्या रायगड चढण्याचे तोंडभरून कौतुकही केले सोबत फोटोही काढले, तेही रितेशच्या मोबाईलमध्ये. रितेशचा वडिल विलासराव देशमुखांसारखाच मनमिळाऊ व दिलदार स्वभाव पाहून ते वृद्ध जोडपे व त्यांचा मुलगा भारावून गेले होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES