• A
  • A
  • A
मान्यताच्या 'बी ग्रेड' फिल्म कारकिर्दीचा संजय दत्तने घेतला होता धसका !

मुंबई - मान्यता दत्तची ओळख संजय दत्तची पत्नी इतकीच मर्यादित राहिली आहे. संजूबाबाशी विवाह होण्यापूर्वी ती एक बी ग्रेड फिल्मची अभिनेत्री होती. याचा एक प्रकारे दबाव संजय दत्तवर होता.

फोटो अधिकृत इन्स्टाग्राम आणि व्हिडिओ ग्रॅबच्या सौजन्याने


मुंबईत जन्मलेली मान्यता दुबईत लहानाची मोठी झाली. बॉलिवूडची अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बाळगून ती मुंबईला परतली. परंतु तिची कारकिर्द बी ग्रेड फिल्मपुरतीच मर्यादित राहून गेली. प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' चित्रपटात तिने एक आयटम साँग केले होते.
संजय दत्तच्या मित्रांच्या मदतीने तिने संजूबाबाशी जवळीक साधली. मान्यताची कारकिर्द 'लव्हर्स लाईक अस' या चित्रपटापुरती असल्याचे संजय दत्तला माहिती होते. एका चित्रपटात काम केल्यानंतर तिने हा नाद सोडून दिला आणि मिसेस दत्त बनली. संजू मात्र तिच्या या कारकिर्दीवर फारसा खूश नव्हता.


यातून बाहेर पडण्यासाठी संजय दत्तने तिच्या एकमेव चित्रपटाचे हक्क 20 लाख रुपयांना खरेदी केले. यातून 'लव्हर्स लाईक अस' चित्रपटाची सीडी अथवा डीव्हिडी मार्केटमध्ये निघणार नाही याची काळजी त्याने घेतली.

मिसेस दत्तचे खरे नाव दिलनवाझ शेख आहे. प्रकाश झा यांनी तिचे मान्यता असे नाव रुपेरी पडद्यासाठी बहाल केले होते.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES