• A
  • A
  • A
रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'मध्ये रणवीर सिंगसोबत मराठमोळा 'सिद्धार्थ जाधव'

रणवीर सिंगच्या सिम्बा चित्रपटाच्या फर्स्ट लुकला घेऊन भलतीच उत्सुकता लागली होती. काही दिवसांपूर्वी रणवीरने एक इंस्टाग्राम टिझर टाकला होता ज्यामुळे चित्रपट भारी कॉमेडी असणार याची चिन्ह दिसत होती.

फोटो इंस्टाग्रामच्या सौजन्याने


रणवीर शेअर केलेल्या या फोटोमध्ये रणवीरच्या डाव्या हाताला मराठमोळा अभिनेता दिसतोय तो म्हणजे 'सिद्धार्थ जाधव'. रोहित शेट्टी दिग्दर्शित करत असलेल्या 'सिम्बा' या चित्रपटात सिद्धार्थ जाधव पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.


वाचा - 'रजनी-फॅन्स'ची अपेक्षापूर्ती करणारा 'काला' !

या आधी रोहित शेट्टीच्या 'गोलमाल - फन अनलिमिटेड' या चित्रपटात सिद्धार्थ जाधवने एक छोटी पण अतिशय विनोदी भूमिका केली होती. त्यानंतर एका कॉमेडी शोमध्ये रोहित शेट्टी जज आणि सिद्धार्थ कॉन्टेस्टंट म्हणून एकत्र काम करत होते. जानेवारी २०१८ मध्ये सिद्धार्थ जाधवचा 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी रोहित शेट्टीने विशेष उपस्थिती लावली होती. म्हणजे रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ जाधवची दोस्ती तशी फार जुनी आहे. आणि त्यामुळेच सिद्धार्थच नाव नेहमीच रोहितच्या लक्षात राहीले. त्याचीच परिणीती म्हणून रोहितच्या सिम्बामध्ये अगदी रणवीर सिंगसोबत सिद्धार्थ जाधवची वर्णी लागली आहे.

वाचा - मेंटल है क्या'मध्ये हटके भूमिकेत दिसणार 'बॉलीवुड क्वीन' कंगना !

सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची कॉमेडी पाहायला नक्की खूप मज्जा येईल असं दिसतंय.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES