• A
  • A
  • A
एकही पोस्ट नाही, तरी आमिरचे इन्स्टाग्रामवर २,३६,००० फॉलोअर्स !

मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या चाहत्यांना खूश करीत आपल्या ५३ व्या वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. आजपर्यंत तो फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात होता. आता त्याने इन्स्टाग्रामचे खाते उघडून चाहत्यांना खूश केले आहे.


विशेष म्हणजे अद्याप त्याने एकही पोस्ट लिहिलेली नाही किंवा फोटोही पोस्ट केलेला नसला तरी तब्बल २,३६,००० फॉलोअर्स मिळाले आहेत.


आमिर खानचे ट्विटरवर २३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर त्याला १५ दशलक्ष लोक फॉलो करतात.

आमिर खान सध्या जोधपूरमध्ये 'ठग्ज ऑफ हिंदूस्थाँ'चे शूटींग करीत आहे.

आमिर खानचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबई येथे चित्रपट निर्माते ताहिर हुसेन व झीनत हुसेन यांच्या घरात झाला. त्याचे काही नातेवाईक हिंदी चित्रपट सृष्टीचे सदस्य आहेत.

आठ वर्षाचा असताना नसीर हुसैन दिग्दर्शित अत्यंत लोकप्रिय गाणे 'यादो कि बारात' मध्ये दिसला होता. त्यानंतर पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मिती असलेल्या 'मदहोश' चित्रपटात महेंद्रसिंग संधूची तरुण भूमिका केली होती. १९८८ मध्ये 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून तो नायकाच्या रुपात झळकला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.

'दिल है की मानता नही', 'हम है राही प्यार के', 'अंदाज अपना अपना', 'रंगीला', 'राजा हिंदूस्थानी', 'सरफरोश', 'लगान', 'दिल चाहता है', 'तलाश', 'थ्री इडियट', 'दंगल' हे त्याची काही गाजलेले चित्रपट आहेत.

भरत सरकारच्या वतीने त्याला २००३ मध्ये पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES