• A
  • A
  • A
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्रवर लैंगिक शोषणाचा आरोप, पोलिसांत तक्रार

मुंबई/शिमला - ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. याप्रकरणी पीडितेने हिमाचल प्रदेश (शिमला) येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तक्रारीनुसार पीडित महिला ही जितेंद्र यांची नातेवाईक लागते. जेव्हा पीडित महिला १८ वर्षांची होती तेव्हा जितेंद्र यांनी हिमाचल प्रदेश येथे तिचे लैंगिक शोषण केले, असे या महिलेने म्हटले आहे.


महिलेने नोंदविलेल्या तक्रारीनुसार माझ्या पालकांची परवानगी घेऊन अभिनेता जितेंद्र यांनी मला त्यांच्या चित्रपटाचे शुटिंग दाखवण्याच्या बहाण्याने शिमल्यात नेले. तिथे अभिनेता जितेंद्र यांनी माझे लैंगिक शोषण केले, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीत नोंदविण्यात आलेल्यानुसार पीडित महिलेचे वय तेव्हा १८ तर अभिनेता जितेंद्र यांचे वय २८ होते.

महिलेने याची तक्रार आई-वडिलांच्या निधनानंतर करण्याचे ठरवले होते. जितेंद्र यांनी माझे लैंगिक शोषण केले आहे, असे जर माझ्या आई-वडिलांना कळाले असते, तर त्यांना तीव्र दु:ख झाले असते. आई-वडिलांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मी आता तक्रार दाखल केली, असे पीडितेने म्हटले आहे.

पीडितेने पुढे म्हटले आहे, की याप्रकारामुळे मी अनेक वर्ष मानसिक तणावात होते. त्यामुळेच मला उशीर लागला. फेमिनिस्ट अव्हेअरनेस कॅम्पेन #METOO मुळे मला बळ मिळाले आणि मी तक्रार नोंदविली, असे पीडितेने म्हटले आहे. या मोहिमेद्वारे हॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली आहे. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी या वृत्तावर अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES