• A
  • A
  • A
व्हिडिओ : महिलांकडे विचित्र नजरेने बघत बसमध्येच हस्तमैथून

कोलकाता - एका व्यक्तीने बसमध्येच हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा व्यक्ती दोन महिलांकडे विचित्र नजरेने बघत हस्तमैथून करत होता. संबंधित महिलांनी घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.


हस्तमैथून करणारा व्यवसायाने फेरीवाला आहे. त्याला शहरातील श्यामपुकूर पोलीस ठाण्याच्या भागातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही घटना शनिवारी समोर आली. संबंधित दोन महिलांपैकी एका महिलेने स्वतःच्या आणि कोलकाता पोलिसांच्या फेसबुक पेजवर दोन व्हिडिओ पोस्ट पोस्ट केले होते. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समजते.

हेही वाचा - आसाममध्ये सहा वर्षाच्या हिंदू मुलावर सुंता केल्याचा आरोप


'१५ दिवसांपूर्वीही घडला होता असाच प्रकार'

या दोन्ही व्हिडिओमध्ये एक वयोवृद्ध व्यक्ती अश्लिल हावभाव करताना आणि बसमध्येच हस्तमैथून करताना दिसत आहे. यासंदर्भात महिलेने फेसबुकवर सांगितल्यानुसार, १५ दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती. याच व्यक्तीने आपली पॅन्ट काढून त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवला होता.

हेही वाचा - तेजप्रताप-ऐश्वर्या बोहल्यावर; मंच तुटल्याने सोहळ्याला गालबोट


पीडितेने म्हटले आहे, की, 'जेव्हा मी आणि माझ्या मैत्रिणीने विरोध करत कंडक्टरकडे तक्रार केली. तेव्हा कंडक्टरने आमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. १५ दिवसांपूर्वीही या व्यक्तीने असेच चाळे केले होते. मात्र, तेव्हा आम्ही काहीही करू शकलो नाही. कारण, आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आता आमच्याकडे पुराव्यांच्या स्वरुपात दोन व्हिडिओ आहेत आणि आम्हाला न्याय हवा आहे.'


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES