• A
  • A
  • A
२००३ मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सुत्रधार हनिफचा कारागृहातच मृत्यू

नागपूर - नऊ वर्षापासून मृत्यूदंडाची शिक्षा भोगत असलेला दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहिमचा (वय ५६)अखेर रविवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहातच मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. ५२ निरपराध्यांना मृत्यूच्या दारात टाकणारा मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम हा मृत्यूदंडाची शिक्षा भोगत होता.


हेही वाचा - जातीचं नाव काढणाऱ्यांना मी ठोकून काढेन - नितीन गडकरी

गुजरात रिव्हेंज फोर्सचा प्रमुख आणि लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी अशी मोहम्मद हनिफ रहीमची ओळख होती. तो २५ ऑगस्ट २००३ मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार होता. त्यावळी झवेरीत झालेल्या भयावह स्फोटात ३६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १३८ जण गंभीर जखमी झाले होते तर, गेट वे ऑफ इंडियाजवळ घडवून आणलेल्या स्फोटात १६ जणांचा मृत्यू तर ३६ लोकांना गंभीर दुखापत झाली होती.
हेही वाचा - पुण्यातील एल. अँड टी. कंपनीतील कामगारांचे उपोषण सुरूच, एकाची प्रकृती खालावली

मृत्यूदंडाच्या शिक्षेनंतर हनिफ हा पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. १८ ऑक्टोबर २०१२ ला त्याची नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. हनिफला फाशीची शिक्षा सुनावून ९ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नव्हती. अखेर निसर्गानेच त्याचा हिशोब केला.

हेही वाचा - लखनौमध्ये प्रियांका गांधींचे जोरदार स्वागत; 'रोड शो'ला प्रचंड प्रतिसादCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES