• A
  • A
  • A
बाळापूर शहर हादरले; पतीने केली पत्नीसह सासरा आणि मेव्हण्याची हत्या

अकोला - कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह मेव्हणा आणि सासऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना बाळापूर शहरात घडली. या प्रकरणी आरोपी सै.फिरोज सै. रज्जाक याला अटक करण्यात आली आहे.


शहरातील आबाद नगर परिसरात ही घटना घडली. बुधवारी रात्री कोयत्याने वार करुन या आरोपीने मेहबूब खान, आणि फिरोज मेहबूब खान यांची हत्या केली. अनेक दिवसांपासून आरोपीची पत्नी सासरी राहत नसल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद होता. हाच वाद टोकाला जावून त्याचे रुपांतर हत्येत झाले.


हेही वाचा - केडगाव शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास अखेर सीआयडीकडे

आरोपी पती हा बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहिवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. याच कारणाने त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती. तिचे आई-वडीलदेखील तिला सासरी पाठवत नव्हते. अनेक दिवसांपासून पत्नी माहेरी असल्याने आरोपी बाळापुरात येऊन वाद घालत होता. हाच राग अनावर होत त्याने पत्नी सासरे आणि मेव्हण्याला ठार मारले.

विवाहाचा तगादा लावल्याने प्रेयसीला जिवंत जाळले, टॅटूमुळे झाला खुलासा

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, बाळापूर प्रभारी ठाणेदार अनिल ठाकरेंसह पोलिसांचा मोठा ताफा बाळापुरात दाखल झाला. यामध्ये सहभागी असलेला एका फरार आरोपीला बार्शीटाकळी येथून अटक करण्यात आली.





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES